new-img

केंद्राची 30 हजार मेट्रिक टन तांदूळ निर्यातीला परवानगी

केंद्र सरकारने टांझानिया देशाला 30 हजार मेट्रिक टन बिगर बासमती तांदूळ निर्यातीला मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील तांदळाच्या किंमती आटोक्यात ठेण्यासाठी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. पण हा निर्णय घेताना परदेशी धोरणानुसार केंद्र सरकारने काही देशांना निर्यात करण्याची सूट दिली होती. त्याप्रमाणे केंद्र सरकारने टांझानिया, जिबूती आणि गिनी बिसाऊ या देशांना तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या मार्फत निर्यात केली जाणार आहे. याबाबत विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना काढली आहे.