new-img

केंद्र सरकार पाच लाख टन कांदा खरेदी करण्याच्या तयारीत

केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकसाठी यावर्षी पाच लाख टनकांद्याची खरेदी करण्याची योजना आखत आहे, ज्याचा उपयोग भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो; मात्र शेतकऱ्यांकडून या निर्णयास कडाडून विरोध होत आहे. मागील वर्षी 'एनसीसीएफ' व 'नाफेड 'मार्फत सात लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. त्यात यंदा दोन लाख टनांनी घट होईल.

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत सरकार या महिन्याच्या अखेरीस निर्णय घेऊ शकते. निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत आहे. 2023-24 मध्ये कांद्याच्या उत्पादनात अंदाजे घट झाल्यामुळे बफर स्टॉक तयार करण्याची सरकारची योजना आहे. 2023-24 मध्ये महाराष्ट्रात 34.31 लाख टन, कर्नाटकात 9.95 लाख टन, आंध्र प्रदेशात 3.54 लाख टन आणि 3.21 लाख टन कांद्याचे उत्पादन गेल्यावर्षीच्या 302.08 लाख टनांच्या तुलनेत सुमारे 254.73 लाख टन राहण्याची अपेक्षा आहे.