new-img

अकलूज बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव

रविवारी बहुतांश बाजार समित्या या बंद राहतात. त्यामुळे काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. त्यानुसार राज्यातील बाजार समित्यांमधील बाजारभाव पाहता ह्या रविवारी (दि. 10) 1300 रुपयांचा सरासरी दर मिळाला. रविवार, 10 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आठ बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. यात राहता, अकलुज, भुसावळ, पुणे, पुणे- खडकी, पुणे -पिंपरी, पुणे-मोशी आणि मंगळवेढा बाजार समितीत लिलाव पार पडले.

त्यानुसार सर्वाधिक 25 हजार क्विंटल कांद्याची आवक पुणे बाजार समितीत झाली. त्यानंतर अनुक्रमे राहता 2260 क्विंटल, सातारा 441 क्विंटल, पुणे-मोशी 432 क्विंटल, अकलुज 220 क्विंटल अशी कांद्याची आवक झाली. सर्वात कमी 3 क्विंटलची आवक मंगळवेढा बाजार समितीत झाली. रविवारी सर्वाधिक 1800 रुपयांचा बाजारभाव अकलुज बाजार समितीत लाल कांद्याला मिळाला.