new-img

पुण्यात येणाऱ्या सर्व महामार्गांवर उपबाजार, बाजार समितीची माहिती

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे फळे भाजीपाल्यांची गरज वाढत आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या सर्व महामार्गांवर
उपबाजार उभारणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी दिली. शहरामध्ये येणाऱ्या सर्व महामार्गालगत उपबाजार उभारण्याचे बाजार धोरण आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरात मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरालगत उपबाजार उभारल्यास शहरात येणारी मोठी वाहने तेथील बाजारातच थांबतील, असे काळभोर म्हणाले.

खालील ठिकाणी सुरु होणार उपबाजार -
- सोलापूर रस्ता कोरेगाव मुळ 11 एकर जागेत प्रायोगिक तत्वावर बाजार सुरू करणार
- सातारा रस्ता खेड शिवापूरात 5 एकर जागेत तातडीने उपबाजार उभारणार
- उत्तमनगर येथील 4 एकर जागेत उपबाजार सुरू
- नगर रस्त्यावरील पेरणे येथे 10 एकर जागेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा, आराखडा तयार