new-img

नवीन हळद खरेदीला सुरुवात; रिसोड बाजार समितीत 17 हजाराचा दर

हळद काढणीला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आता नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीत हळद खरेदीला सुरवात झाली असून नव्या हळदीला प्रतिक्विंटल 17 हजार इतका दर मिळाला आहे.

हळद खरेदीसाठी वाशिम जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारपासून (दि. 14) हळद खरेदीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी हळद विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा शेला-टोपी देऊन आमदार अमित झनक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पहिल्याच दिवशी नव्या हळदीला 17 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.