new-img

देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत निंबोळा येथे उपबाजार आवार

नाशिक जिल्ह्यातील देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तालुक्यातील निंबोळा येथील उप बाजारात सोमवारी (दि. 11) बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर यांच्या हस्ते शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. ह्या खरेदी विक्री केंद्रावर पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला सर्वाधिक 3 हजार 1 रुपये प्रति किंटल भाव मिळाला.

देवळा बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाने तालुक्‍यातील निंबोळा येथे उप बाजार आवार सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारी उप बाजार आवाराचे लोकार्पण करण्यात आले.

उप बाजारात पहिल्याच दिवशी उन्हाळा कांद्याची जवळपास 7 हजार क्विंटल आवक झाली. त्यात निंबोळा येथील माजी सरपंच व प्रगतिशील शेतकरी जव्हार निकम यांच्या कांद्याला सर्वाधिक 3001 रुपये व सोनू बच्छाव, लखमापूर यांच्या कांद्याला 2001रुपये भाव मिळाला. तर कमीत कमी 500 व सरासरी 1600 रुपये याप्रमाणे कांद्याची खरेदी करण्यात आली.