new-img

मिरचीला मिळतोय १५ ते २५ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव

मिरचीला मिळतोय १५ ते २५ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव

सध्या शेतीमालाच्या दरात सतत चढउतार होतांना दिसत आहे. त्यातच आता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे.मिरचीच्या भावात चांगली सुधारणा झाली असुन सध्या मिरचीला दर हा १५ हजार ते २५ हजार रूपयांचा भाव मिळत आहे. 


तर आतापर्यंत मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली.सध्या मिरचीला मिरचीच्या वाणाप्रमाणे सध्या बाजारात दर मिळत आहे. सद्या बाजारातील आवक कमी प्रमाणात आहे. यंदा मिरची उत्पादन कमी राहणार आहे. ही परिस्थितीत लक्षात घेऊन व्यापारी आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत. मिरचीच्या भावात भविष्यात दरात अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे पुढील काळात मिरचीच्या दरात तेजी येणार आहे.  मिरचीच्या वाढत्या दरामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.