new-img

सोयाबीनला मिळतोय ४५०० पर्यंत दर

सोयाबीनला मिळतोय ४५०० पर्यंत दर

सोयाबीन दरात गेल्या अनेक दिवसांपासुन चढउतार होत आहे. २३ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे सोयाबीनला जास्तीत दर हा ४५४५ रूपये मिळाला आहे. तर कमीत कमी दर हा ४२९१ रूपये मिळाला असुन सर्वसाधारण दर हा ४५४५ रूपये मिळाला आहे.


हमीभावपेक्षाही सोयाबीन कमी दरात शेतकऱ्यांना विकावी लागत आहे. दिवसेंदिवस भावात सतत घसरण होत चालल्याने शेतकरी आता घरात साठवलेली सोयाबीन मिळेल त्या भावात विकत आहे. एकीकडे तेलाच्या किंमतीत वाढ होतांना पाहायाला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दरही वाढणार अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. तर काही शेतकरी दरात सुधारणा होईल या आशेने सोयाबीन अजुनही घरात ठेवत आहे. सोयाबीन चे भाव घसरल्याने शेतकरी आता चिंतेत आले आहे. बाजारात सोयाबीनला अजुनही ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर बाजातील आवकही टिकून आहे. पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.