new-img

तुरीला मिळतोय चांगला दर, उत्पादक शेतकरी आनंदात

तुरीला मिळतोय चांगला दर, उत्पादक शेतकरी आनंदात

तुरीला सध्या चांगला दर मिळत आहे. तुरीच्या गुणवत्तेनुसार तुरीला भाव मिळत आहे. तुरीला २३ मार्च रोजी अमरावती, नागपूर येथे सर्वाधिक भाव मिळाला आहे.  इतर बाजारसमितीत देखील तुरीला चांगला भाव मिळाला आहे.  आज राज्यात ४२२१ क्विंटल तुरीची आवक झाली. अमरावतीत तुरीला सर्वसाधारण दर १०,०५० मिळाला आहे. नागपूर येथे १०,१३३ रूपये सर्वसाधारण दर मिळाला आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळला आहे.

तुरीला चांगला भाव मिळत असुनही काही शेतकऱ्यांनी तुर विकली नाही. अजुन भाववाढ मिळेल या आशेत शेतकरी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुरीची मागणी सध्याच्या बाजारात चांगली आहे. परंतु तुरीचे उत्पादन घटले आहे .आणि मागणी वाढली म्हणून सध्याच्या तुर भाववाढीचं हे सर्वात मोठं कारण आहे. अस अभ्यासक म्हणत आहे. तुरीच्या दरानं अखेर १०,००० रुपयांचा टप्पा ओलांडल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.