new-img

लासलगाव बाजारसमितीत कांदा दरात घसरण

लासलगाव बाजारसमितीत कांदा दरात घसरण

मागील काही दिवासांपासुन कांदा दरात सतत घसरण होत आहे. लासलगाव बाजारसमितीत तर कांद्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. सध्या कांद्याला १२०० ते १३०० रूपये दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

लासलगाव बाजारसमितीत काही  दिवसांपुर्वी  कांद्याला १८०० रूपयांपर्यंत भाव मिळत होता पण आता तोच भाव १२०० रूपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे कांदा दरात ४०० ते ५०० रूपयांची घसरण पाहायला मिळत आहे. कांद्यावरची निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंतच लागू होती परंतु आता केंद्र सरकारनं  कांदा निर्यातबंदीला मुदतवाढ देत ती अनिश्चित काळासाठी लागू केलीय. गेल्या तीन महिन्यापासुन  निर्यातबंदी उठेल अशी शेतकऱ्यांना आशा लागली होती. सरकारने निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी वाढवली. केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे ,आणि कांदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याच पाहायला मिळत आहे.  सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.