new-img

हापूस आंब्याला मिळतोय ८०० ते १२०० रुपयांचा दर

 हापूस आंब्याला मिळतोय ८०० ते १२०० रुपयांचा दर

आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. कोकणातील आंबा बाजारात येऊ लागला आहे. बाजारात हापूस आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या जगप्रसिद्ध हापूस आंब्याची ८०० ते १२०० रुपये प्रति डझन या दराने बाजारपेठेत विक्री होत आहे.


फळांचा राजा आंबा हा लहानांपासुन मोठ्यांना प्रत्येकाला आवडत असतो. त्यातच कोकणातील हापूस आंबा हा प्रत्येकालाच आवडतो. त्यामुळे हापूस आंब्याला देशात काय तर परदेशातही चांगली मागणी असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.यावर्षी रत्नागिरी हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यासोबतच कर्नाटकी हापूस आंब्याला ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मुंबई कृषी उत्पन्न समितीमध्ये आंब्यााची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु यंदा उत्पादन घटले आहे. मार्केटमध्ये हापूस आंबा हा डझन च्या दराने विकला जात आहे. हापूस आंब्याला डझनला  ८०० ते १२०० रूपयांचा दर मिळत आहे. तर हापूस आंब्याच्या चार डझनांच्या पेटीला ४००० रूपयांपर्यंत दर मिळत आहे.