new-img

सोलापुरच्या हिरज येथे सुरू होणार कोष विक्रीसाठी नवीन मार्केट

सोलापुरच्या हिरज येथे सुरू होणार कोष विक्रीसाठी नवीन मार्केट

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूरमध्ये हिरज येथे नवीन रेशीम कोष विक्री मार्केट सुरू होणार आहे. जालन्यानंतर आता सोलापूरच्या हिरज येथे ही बाजारपेठ सुरू होणार आहे. पुर्वी कोषाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना इतर राज्यात जावे लागत होते. आता हिरज येथे सुरू होणाऱ्या मार्केटमुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


सध्या रेशीम पीक उत्पादनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हे शेतीसह तुती लागवडीकडे वाढताना दिसत आहे. अवकाळी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण तुतीच्या पिकाचे नुकसान होत नसल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात तुतीचे मोठया प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे तिथे आता नवीन मार्केट सुरू होणार आहे. यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची मोठी चिंता आता मिटणार आहे.