new-img

लाल कांद्याला आज काय भाव मिळाला?

लाल कांद्याला आज काय भाव मिळाला?

लासलगाव बाजारसमितीत मागील काही दिवसांपासुन कांदा दरात सतत घसरण सुरू आहे. २६ मार्च  मंगळवार रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत  ४ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे. तर या कांद्याला सर्वाधिक भाव १,५११  रूपये मिळाला आहे. तर इतर कांद्याला सरासरी १,४०० रुपये भाव मिळाला. सर्वात कमी भाव हा ७०० रूपये मिळाला आहे.


कांद्याच्या दरात होणाऱ्या सतत घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.१५ दिवसांपासुन सलग दरात चढ-उतार होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा फटका बसत आहे. उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. तर सध्या उन्हाळ कांद्याला लाल कांद्यापेक्षा आधिक भाव मिळत आहे परंतु सततच्या घसरणीमुळे कांदा उ्तपादक शेतकरी अ़डचणीत आले आहे. कांद्यावरची निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंतच लागू होती परंतु आता केंद्र सरकारनं  कांदा निर्यातबंदीला मुदतवाढ देत ती अनिश्चित काळासाठी लागू केलीय. गेल्या तीन महिन्यापासुन  निर्यातबंदी उठेल अशी शेतकऱ्यांना आशा लागली होती. सरकारने निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी वाढवली. केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे ,आणि कांदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याच पाहायला मिळत आहे.