new-img

सोलापूरात लाल मिरचीला मिळतोय सरासरी ८००० रूपये भाव

सोलापूरात लाल मिरचीला मिळतोय सरासरी ८००० रूपये भाव

सध्या लाल मिरचीच्या दरात सतत चढउतार होतांना दिसत आहे. सोलापूर मध्ये लोकल वाणाच्या लाल मिरचीला सरासरी ८००० रूपये भाव मिळत आहे. सोलापूर बाजारसमितीत २५ मार्च सोमवार रोजी लाल मिरचीची ६०७ क्विंटल आवक झाली असुन लाल मिरचीला कमीतकमी दर हा २५०० ते जास्तीत दर हा १२७०० रूपये मिळाला असुन सरासरी दर हा ८००० रूपये मिळाला.


२३ मार्च रोजी सोलापूर बाजारसमितीत लाल मिरचीला ८५०० रूपये भाव मिळाला. तर त्याच दिवशी नागपूर बाजारसमितीत मिरचीला १२५०० रूपये भाव मिळाला. यंदा मिरचीचे उत्पादन घटले आहे.  परिस्थितीत लक्षात घेऊन व्यापारी आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत. मिरचीच्या भावात भविष्यात दरात अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे पुढील काळात मिरचीच्या दरात तेजी येणार आहे.