new-img

हरभऱ्याला किती मिळतोय दर?

हरभऱ्याला किती मिळतोय दर?

सध्या शेतमालाच्या बाजारभावात चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता हरभऱ्याचा देखील भावात चढउतार होत आहे. हरभऱ्याचा हमीभाव रुपये ५,४४० आहे. तर आज २६ मार्च रोजी पुणे बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर हा ६९०० रूपये मिळाला.

२६ मार्च आज रोजी पुणे बाजारसमितीत हरभऱ्याची आवक ४३ क्विंटल झाली. तर आज बाजारसमितीत हरभऱ्याला दर हा कमीत कमी ६४०० ते जास्तीत जास्त ७४०० रूपये मिळाला असून सर्वसाधारण दर हा ६९०० रूपये मिळाला.२५ मार्च रोजी देखील हरभऱ्याला सरासरी भाव हा ६७०० रूपये मिळाला असुन कमीत कमी दर ६२०० ते जास्तीत दर ७२०० मिळाला. तर उमरखेड-डांकी बाजारसमितीत हरभऱ्याला कमीत कमी दर हा ५३०० ते जास्तीत दर हा ५४०० तर सरासरी दर हा ५३५० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ८० क्विंटल लाल हरभऱ्याची आवक झाली. काही  बाजार समिती वगळता हरभऱ्याला सरासरी दर ५३५० रूपयांपर्यंत मिळत आहे.