new-img

अमरावतीत सोयाबीनला मिळतोय ४२९० रूपये भाव

अमरावतीत सोयाबीनला मिळतोय ४२९० रूपये भाव

सध्या सोायाबीन चे भाव काही प्रमाणात कमी-जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. २६ मार्च रोजी अमरावती बाजारसमितीत २९२९ क्विंटल सोयाबीन ची आवक झाली. तर सोयाबीनला सरासरी दर हा ४२९० मिळाला. तुळजापूर बाजारसमितीत आज ७० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असुन सरासरी दर ४४०० रूपये मिळाला.

सध्या सोयाबीनच्या भावाची सरासरी भावपातळी  ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीनची आवकही कायम आहे. सोयाबीन बाजारातील अभ्यासकांच्या मते ही परिस्थिती आणि काही आठवडे दिसू शकते.