new-img

तुरीच्या मागणीत वाढ, काय मिळतोय तुरीला भाव?

तुरीच्या मागणीत वाढ, काय मिळतोय तुरीला भाव?

गेल्या अनेक दिवसांपासुन तुरीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तुरीची आवक आता कमी होत असल्याने मागणी वाढत आहे. त्यामुळे तुरीला चांगला भाव मिळत आहे.

तुरीला सध्या चांगला दर मिळत आहे. तुरीच्या गुणवत्तेनुसार तुरीला भाव मिळत आहे. तुरीला २६ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजारसमिती अमरावती येथे सरासरी दर १००३७ रूपये मिळाला. तर कमीतकमी दर हा ९८०० ते जास्तीत दर १०२७५ रूपये मिळाला असुन बाजारसमितीत
लाल तुरीची आवक ही १६१७ क्विंटल झाली. सध्या तुरीला सर्व बाजारसमितीत सरासरी दर हा ८००० ते १०००० रूपयांपर्यंत मिळत आहे. बाजारात तुरीची आवक कमी झाल्याने मागणी वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना कहीसा दिलासा मिळाला आहे.