new-img

आज कांद्याला किती मिळाला भाव?

आज कांद्याला किती मिळाला भाव

गेल्या काही दिवसांपासुन कांदा दरात सतत घसरण होत आहे. कांदा दरात होणाऱ्या सतत घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.  पुणे बाजारसमितीत आज लोकल कांद्याला सरासरी दर  ११०० रूपये मिळत आहे. २९ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सकाळच्या सत्रात पुणे बाजारसमितीत  २१,०१६ क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आहे. तर या कांद्याला सरासरी १,१०० रुपये भाव मिळाला. सर्वात कमी भाव हा  ५०० रूपये मिळाला असुन जास्तीत दर हा १७०० रूपये मिळाला.


पुणे -पिंपरी बाजारसमितीत आज लोकल कांद्याची १० क्विंटल आवक झाली. कांद्याला सरासरी दर हा १४०० रूपये मिळाला. पुणे-मोशी बाजारसमितीत लोकल कांद्याची ५१४ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर हा ११०० रूपये मिळाला. तर या बाजारसमितीत कमीत कमी दर हा ७०० तर जास्तीत दर १५०० रूपये मिळाला. खेड बाजारसमितीत आज ७५ क्विंटल कांद्याची आवक झाली. तर सरासरी दर हा १६०० रूपये मिळाला.कांद्याच्या दरात दरात चढ-उतार होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.