new-img

गव्हाला सरासरी ४५०० पर्यंत मिळतोय दर

गव्हाला सरासरी ४५०० पर्यंत मिळतोय दर

सध्या बाजारात गहू येत आहे. गव्हाच्या व्हरायटीप्रमाणे गव्हाला दर मिळत आहे. तर सध्या गव्हाला बाजारसमितींमध्ये सरासरी दर हा २००० ते ४५०० रूपयांपर्यंत दर मिळत आहे. सध्या गहू काढणी सुरू आहे. त्यामुळे बाजारात नवा गहू विक्रिसाठी येत आहे. त्यामुळे बााजारात गव्हाची आवक वाढली आहे. 
२९ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजारसमिती अकोला येथे गव्हाला सरासरी दर हा ३२०० रूपये मिळाला. तर कमीत कमी दर हा २६०० ते जास्तीत दर हा ३६०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत लोकल गव्हाची आवक ही ११५ क्विंटल झाली आहे. तर जळगाव बाजारसमितीत गव्हाला सरासरी दर हा २६५० रूपये मिळाला. कमीत कमी २६५० जास्तीत दर हा २७५० मिळाला असुन या बाजारसमितीत १८ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे.