new-img

सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर

सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर

सध्या सोायाबीन चे भावात सतत चढउतार होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. २९ मार्च रोजी उमरखेड-डांकी येथे पिवळ्या सोयाबीनची बाजारसमितीत २६० क्विंटल सोयाबीन ची आवक झाली. तर सोयाबीनला सरासरी दर हा ४४५० मिळाला. त्याच बाजारसमितीत कमीत कमी दर हा ४३५० तर जास्तीत दर हा ४५०० मिळाला.जळगाव बाजारसमितीत आज ७१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असुन सरासरी दर ४१७५ रूपये मिळाला.कमीत कमी दर हा व जास्तीत दर ४१७५ रूपये मिळाला.


सध्या सोयाबीनच्या भावाची सरासरी भावपातळी  ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीनची आवकही कायम आहे. सोयाबीन बाजारातील अभ्यासकांच्या मते ही परिस्थिती आणि काही आठवडे दिसू शकते.