new-img

लाल कांद्याला किती मिळतोय दर ?

लाल कांद्याला किती मिळतोय दर ?

कांदा दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. सध्या लाल कांद्याला सरासरी १३७५ रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.


३० मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कांद्यााला सरासरी अमरावती बाजारसमितीत १२०० रूपये भाव मिळाला असुन ४०८ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. नागपूर बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी १३७५ रूपयांपर्यंत भाव मिळाला. तर या बाजारसमितीत कांद्याला कमीत कमी १००० तर जास्तीत जास्त १५०० रूपये दर मिळाला असुन लाल कांद्याची १२४० क्विंटल कांद्याची आवक झाली. भुसावळ बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी १३०० रूपये भाव मिळाला असुन या बाजारसमितीत कांद्याची कमी आवक झाली आहे.कांद्याच्या दरात दरात चढ-उतार होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.