new-img

सोयाबीन आवक कमी, सोयाबीनला आज काय भाव मिळाला?

सोयाबीन आवक कमी, सोयाबीनला आज काय भाव मिळाला?

सध्या सोायाबीन चे भावात सतत चढउतार होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सध्या सोयाबीनच्या भावाची सरासरी भावपातळी  ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.


महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज १ एप्रिल रोजी कृषी उत्पन्नबाजारसमिती देउळगाव राजा येथे सर्वात कमी १ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असुन त्या पिवळ्या सोयाबीनला दर हा ४१०० रूपये मिळाला आहे. हिंगोली-खानेगाव नाका बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीला सरासरी दर हा ४२७५ मिळाला असुन कमीत कमी दर हा ४२५० तर जास्तीत जास्त दर हा ४३०० रूपये मिळाला आहे. तर या बाजारसमितीत आज सोयाबीन ची ५४ क्विंटल आवक झाली. कृषी उत्पन्न बाजारसमिती नागपूर येथे लोकल सोयाबीनला सरासरी दर ४२५८ रूपये मिळाला. तर या बाजारसमितीत सोयाबीनची ११४ क्विंटल आवक झाली आहे. 
सोयाबीन दरात सतत घसरण सुरू आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनला दर मिळेल या आशेने घरात साठवुन ठेवलेली सोयाबीन शेतकरी मिळेल त्या भावात विकत आहे. तर काही शेतकरी सोयाबीन चे दर वाढतील अशी आशा करत आहे.