new-img

हरभरा दरात नरमाई, काय मिळतोय भाव

हरभरा दरात नरमाई, काय मिळतोय भाव

हरभऱ्याच्या दरात काहीशी नरमाई आली आहे. सध्या अनेक शेतमालांच्या दरात चढउतार आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासुन हरभरा दरात काहीशी घसरण झाली आहे. अनेक बाजारसमितींमध्ये हरभऱ्यााला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे.


महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज १ एप्रिल रोजी हरभऱ्याला कृषी उत्पन्न बाजारसमिती उमरखेड येथे सरासरी ५३०० रूपये दर मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीत कमी दर हा ५२५० ते जास्तीत जास्त दर हा ५३५० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत २४० क्विंटल लाल हरभऱ्याची आवक झाली आहे. कृषी उत्पन्न बाजारसमिती पालम येथे आज हरभऱ्याला ५४५१ रूपये सरासरी दर मिळाला असुन लाल हरभऱ्याची ३५ क्विंटल आवक झाली आहे. तर आज कल्याण येथे हायब्रीड हरभऱ्याची ३ क्विंटल आवक झाली तर या हरभऱ्याला सरासरी दर ५९५० रूपये मिळाला आहे. सध्या हरभरा दरात काहीशी  नरमाई आली असली तरी अनेक बाजारसमितींमध्ये हमीभावपेक्षा ही कमी किंवा दरम्यान दर मिळत आहे.