new-img

लाल हरभरा दरात घसरण

लाल हरभरा दरात घसरण

सध्या अनेक शेतमालांच्या दरात चढउतार आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासुन हरभरा दरात काहीशी घसरण झाली आहे. अनेक बाजारसमितींमध्ये हरभऱ्यााला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज २ एप्रिल रोजी हरभऱ्याला कृषी उत्पन्न बाजारसमिती उमरखेड येथे सरासरी ५३५० रूपये दर मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीत कमी दर हा ५२०० ते जास्तीत जास्त दर हा ५४००  रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत २२० क्विंटल लाल हरभऱ्याची आवक झाली आहे. कृषी उत्पन्न बाजारसमिती उमरखेड -डांकी येथे  आज हरभऱ्याला  ५३०० रूपये सरासरी दर मिळाला असुन लाल हरभऱ्याची १२० क्विंटल आवक झाली आहे. सध्या हरभरा दरात काहीशी  नरमाई आली असली तरी अनेक बाजारसमितींमध्ये हमीभावपेक्षा ही कमी किंवा दरम्यान दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.