new-img

पिवळ्या सोयाबीनला हमीभावपेक्षाही कमी दर, उत्पादक शेतकरी संकटात

पिवळ्या सोयाबीनला हमीभावपेक्षाही कमी दर, उत्पादक शेतकरी संकटात

सध्या सोायाबीन चे भावात सतत चढउतार होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सध्या सोयाबीनच्या भावाची सरासरी भावपातळी  ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज २ एप्रिल रोजी कृषी उत्पन्नबाजारसमिती उमरखेड येथे ६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी दर हा ४३५० रूपये मिळाला असुन कमीत कमी दर हा ४३०० ते जास्तीत दर हा ४४०० रुपये मिळाला. तर उमरखेड- डांकी बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर ४३५० रूपये मिळाला. या बाजारसमितीत आवक ही १०० क्विंटल झाली आहे. केंद्र सरकारने सोयाबीनला ४६०० रूपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे सोायबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.