new-img

पांढऱ्या ज्वारीची आवक वाढली

पांढऱ्या ज्वारीची आवक वाढली

सध्या राज्यातील बाजारांत पांढऱ्या ज्वारीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यासोबतच लोकल, पांढरी, शाळू रब्बी, मालदंडी, दादर या ज्वारींची देखील आवक होत आहे. ज्वारीला सरासरी १९५० ते 
४२५० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.


आज ०४ एप्रिल आज महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पालम बाजारसमितीत ४७क्विंटल पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. पालम बाजारसमितीत सर्वसाधारण ज्वारीला ३२५१ रूपये दरमिळाला आहे. कमीत कमी दर हा ३२५१ तर जास्तीत जास्त दर देखील ३२५१ रूपये मिळाला आहे. तर ३ एप्रिल रोजी मालदांडी ज्वारीला सरासरी ४२०० रूपये भाव मिळाला आहे. लोकल ज्वारीला २२५१ ते ४२५० रूपयांपर्यंत भाव मिळाला आहे. दादर ज्वारील ३५०० रूपयांपर्यंत  भाव मिळाला आहे. तरहायब्रीड ज्वारीला ३३५१ रूपयांपर्यंत दर मिळाला आहे.तर सध्या बाजारसमितीत हायब्रीड व पांढऱ्या ज्वारीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.