new-img

कांदा दरात घसरण, कांद्याला आज काय भाव मिळाला?

कांदा दरात घसरण, कांद्याला आज काय भाव मिळाला? 

गेल्या काही दिवसांपासुन कांदा दरात सतत घसरण होत आहे. सध्या बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा ५०० ते १६०० रूपयांपर्यंत मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज ६ एप्रिल रोजी लासलगाव- विंचुर बाजारसमितीत सर्वाधिक आवक झाली. तर आज या बाजारसमिती कांद्याची ९१०० क्विंटल आवक झाली असुन कांद्याला सरासरी दर हा १३५० रूपये मिळाला असुन कमीत कमी दर हा ७०० ते जास्तीत जास्त दर हा १४६० रूपये मिळाला आहे. तर आज पुणे- पिंपरी बाजारसमितीत सर्वात कमी लोकल कांद्याची आवक झाली असुन सरासरी दर हा १२५० रूपये मिळाला असुन कमीत कमी दर हा १००० तर जास्तीत दर हा १५०० रूपये मिळाला आहे