new-img

तुरीचे दर १० हजारांचा पार, तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता

तुरीचे दर १० हजारांचा पार, तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता

 बाजारात तुरीची आवक कमी झाली आहे. तुरीची कमतरता निर्माण झाल्याने तुरीचे भाव हे वाढत आहे. तुरीला सध्या सरासरी १० हजारांच्या वर भाव मिळत आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.


महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार तुरीला ७ एप्रिल रोजी सरासरी दर हा ८००० ते ११००० रूपयांपर्यंत मिळला आहे. बाजारसमितीत तुरीच्या गुणवत्तेप्रमाणे तुरीला कमी दर मिळत आहे. देवणी बाजारसमितीत तुरीला काल सर्वाधिक दर हा सरासरी १०८२५ रूपये मिळाला आहे.  या बाजारसमितीत ३ क्विंटल तुरीची सर्वात कमी आवक झाली आहे. कर्जत अहमदनगर बाजारसमितीत पांढऱ्या तुरीला सरासरी १०००० पर्यंत भाव मिळाला असुन बाजारसमितीत तुरीची आवक ही ४६ क्विंटल झाली आहे. तुरीची आवक कमी झाली आहे त्यामुळे तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. कारंजा बाजारसमितीत ५ एप्रिल रोजी तुरीने १२००० हजारांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.