new-img

गव्हाला प्रतिक्विंटला मिळतोय विक्रमी दर

गव्हाला प्रतिक्विंटला मिळतोय विक्रमी दर 

सध्या राज्यातील गहू उत्पादक  शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. एकीकडे शेतमालाच्या भावात चढउतार सुरू आहे. त्यात गव्हाला आता चांगला दर मिळत आहे. गव्हाच्या दरात आता मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या प्रतिक्विंटल गव्हाला सरासरी दर हा २५०० ते ३९०० रूपयांच्या दरम्यान मिळत आहे. त्यामुळं गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. 


महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ८ एप्रिल रोजी ताडकळस बाजारसमितीत नं १ च्या गव्हाला सरासरी २५०० रूपये दर मिळाला असुन कमीत कमी दर हा २१०० ते जास्तीत जास्त दर हा २७०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत आज २९ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. सरकारने चालू वर्षासाठी गव्हाचा एमएसपी 2275 रुपये जाहीर केला आहे. तर गव्हाला सध्या एमएसपीपेक्षा जास्त दर मिळत आहे. गव्हाच्या दरात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा मिळतोय.