new-img

सोयाबीनच्या दरात घसरण, उत्पादक शेतकरी संकटात

सोयाबीनच्या दरात घसरण, उत्पादक शेतकरी संकटात 

बाजारसमितींमध्ये सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सोयाबीनच्या सततच्या उतरत्या भावामुळे भाव वाढेल या आशेने ठेवलेली सोयाबीन मिळेल त्या भावात शेतकरी विकत आहे. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ८ एप्रिल रोजी उमरखेड बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी दर हा ४३५० रूपये मिळाला असुन कमीतकमी दर हा ४३०० ते जास्तीत दर हा ४४०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची आवक ही १०० क्विंटल झाली आहे. सोयाबीनच्या भावात ७० टक्के घट झाली आहे. 

सोयाबीन शेतकऱ्यांनी भा व वाढेल या आशेने साठवुन ठेवली होती. मिळेल त्या भावात सोयाबीन विकावी लागत असल्याने उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर काही शेतकरी अद्यापही भाव वाढीची प्रतिक्षा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.