new-img

आज हरभऱ्याला किती मिळतोय दर?

आज हरभऱ्याला किती मिळतोय दर?


शेतमालाच्या भावात सध्या मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. हरभऱ्याची आवक वाढली असून हरभऱ्याला सरासरी हमीभावापेक्षा कमी किंवा हमीभावादरम्यान दर मिळत आहे. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ८ एप्रिल रोजी उमरखेड बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर हा ५३०० रुपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीत कमी दर हा ५२०० रूपये मिळाला असून १९० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे.


ताडकळस बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर हा ५४०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत हरभऱ्याची आवक ही ३७ क्विंटल झाली आहे, बाजारसमितींमध्ये आवक वाढल्याने हरभरा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.