new-img

लाल मिरचीची आवक वाढली, बाजारसमितीत किती मिळतोय दर

लाल मिरचीची आवक वाढली, बाजारसमितीत किती मिळतोय दर

 बाजारसमितींमध्ये लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लाल मिरचीला समाधानकारक दर मिळत आहेै. लाल मिरचीला सरासरी ८००० ते जास्तीत जास्त १९००० पर्यंत भाव मिळत आहे. मिरचीच्या गुणवत्तेप्रमाणे व व्हरायटीप्रमाणे सध्या मिरचीला दर मिळत आहे.

 महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ८ एप्रिल रोजी लाल मिरचीला मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत ३२५०० रूपये दर मिळाला आहे. या बाजारसमितीत मिरचीला कमीतकमी बाजारभाव हा २३ हजार ते जास्तीत भाव हा ४२००० हजार रूपये मिळाला असुन ११३ क्विंटल लाल मिरचीची आवक झाली आहे.

 नागपूर बाजारसमितीत लोकल मिरचीला सरासरी दर हा ११ हजार रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत आवक ३५०० क्विंटल आवक झाली आहे. लाल मिरचीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना दर ही समाधानकारक मिळत असल्याचे चित्र आहे.