new-img

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, स्कायमेटने दिला सामान्य पावसाचा अंदाज

 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, स्कायमेटने दिला सामान्य पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  स्कायमेटने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  देशभरात यंदाचा मान्सून सामान्य असणार असल्याचे स्कायमेटने अंदाजात म्हटले आहे.  

१२ जानेवारी रोजी स्कायमेटने पहिला अंदाज वर्तवला होता. आता दुसऱ्या अंदाजानुसार एल-निनोचे रुपांतर आता ला-निनामध्ये होत आहे. यामुळे पाऊस सामान्य होईल. यंदा महाराष्ट्र, मध्य प्रदेशात जोरदार पाऊस असणार आहे. नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के  म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मान्सून असणार आहे. असा अंदाज दिला आहे.

एल-निनो कमजोर होऊ लागला आहे.  जून ते ऑगस्ट च्या दरम्यान ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे  पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा निश्चितच फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे.