new-img

राजापुरीला हळदीला किती मिळतोय दर?

राजापुरीला हळदीला किती मिळतोय दर? 

यंदा बाजारात हळदीच्या दरात चांगली सुधारणा आली असल्याचं पाहायला मिळत आहे. राजापुरी हळदीला चांगला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार १० एप्रिल रोजी पुर्णा कृषी उत्पन्न बाजारसमितीत राजापुरी हळदीची ५३ क्विंटल आवक झाली असुन या हळदीला सरासरी दर हा १४ हजार ५०० रूपये मिळाला आहे.

नं 1 च्या हळदीला जिंतुर बाजारसमितीत सरासरी भाव हा १४,५०० मिळाला असुन १५० क्विंटल हळदीची आवक झाली आहे. सेनगाव बाजारसमितीत लोकल हळदीला सरासरी दर हा १३ हजार रुपये मिळाला असुन १६५ क्विंंटल हळदीची आवक झाली आहे.
सध्या हळदीच्या दरात चांगली तेजी असुन पुढील काळात भाव टिकून राहतील अस हळद बाजारातील अभ्यासक सांगत आहे.