new-img

टोमॅटोच्या दरात घसरण, उत्पादक शेतकरी संकटात

 टोमॅटोच्या दरात घसरण, उत्पादक शेतकरी संकटात  


शेतीमालातील बाजारभावात गेल्या अनेक दिवसांपासुन चढउतार सुरू आहेत. आता टोमॅटो दरात काहीशी घसरण झाली आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. आणि त्यामुळे दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत. 
टोमॅटोला सध्या सरासरी भाव हा ६०० ते १००० रूपयांपर्यंत मिळत आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढत आहे. पुणे बाजारसमितीत टोमॅटो ला आज ११ एप्रिल रोजी राहता बाजारसमितीत सरासरी दर हा ७०० रूपये मिळाला. पुणे- पिंपरी बाजारसमितीत सरासरी १ हजार, पुणे-मोशी बाजारसमितीत सरासरी ९०० रूपये दर मिळाला आहे. बाजारातील व्यापारांच्या अंदाजानुसार हे दर अजुन काही दिवस असेच राहू शकतात.