new-img

तुरडाळीचा मागणीत वाढ, मिळतोय क्विंटलमागे असा भाव

तुरडाळीचा मागणीत वाढ, मिळतोय क्विंटलमागे असा भाव

गेल्या काही दिवसांपासुन बाजारसमितींमध्ये तुरीचे दरात सुधारणा झाली आहे.  तुरीला पाणी कमी मिळाल्याने यंदा तुर उत्पादनात घट झाली आहे. तुरीचे भावात सुधारणा झाली असुन तुरीला १२ हजारांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे तुर डाळीचे देखील भाव वाढत आहे. बाजारात तुर डाळ ही १५० ते १६० रूपये किलोने विक्री होत आहे. 
सध्या बाजारसमितींमध्ये तुर डाळीला सरासरी दर हा १५००० रूपयांपर्यंत मिळत आहे. तुर डाळीची आवक कमी झाली असुन मागणी वाढली आहे. १० एप्रिल रोजी तुर डाळीला मुंबई बाजारसमितीत सरासरीद दर हा ११ हजार तर जास्तीत जास्त दर हा १७००० रूपये मिळाला आहे.
अभ्यासकांच्या मते तुर डाळीचे दर हे अजुन वाढण्याची शक्यता आहे.