new-img

आज गव्हाला किती मिळतोय दर?

आज गव्हाला किती मिळतोय दर?

राज्यात सध्या गहू काढणी सुरू आहे. नविन गहू शेतकरी बाजारात विकण्यासाठी आणत आहे. बाजारसमितींमध्ये लोकल, बन्सी, शरबती या गव्हांची आवक होत आहे. सध्या बाजारसमितींमध्ये शरबती गव्हाला चांगला दर मिळत आहे. शरबती गव्हाला साधारणपणे २००० ते ४५०० पर्यंत दर मिळत आहेै.
आज १२ एप्रिल रोजी पालघर बाजारसमितीत गव्हाला सरासरी दर हा ३१७० रूपये मिळाला. गुरवारी पुणे बाजारसमितीत शरबती गव्हाला सरासरी ४६०० रूपये क्विंटल दर मिळाला. या बाजारसमितीत कमीतकमी भाव हा ४००० तर जास्तीतजास्त भाव हा ५२०० रूपये मिळाला असुन ४२५ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. पुण्यामध्ये शरबती गव्हाला सरासरी दर हा २००० ते ४५०० रूपये भाव मिळत आहे. काही बाजारसमितींमध्ये गव्हाला दर हा २५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.
गव्हाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे.