new-img

हळदीला कोणत्या बाजारसमितीत मिळतोय सर्वाधिक दर?

हळदीला कोणत्या बाजारसमितीत मिळतोय सर्वाधिक दर?

बाजारसमितींमध्ये हळदीला सरासरी समाधानकारक दर मिळत आहे. नव्या हळदीला हळदीच्या गुणवत्तेनुसार दर मिळत आहे. हळदीला चांगला दर मिळाल्याने हळद उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार जिंतुर बाजारसमितीत नं १ च्या हळदीला सरासरी दर हा १३२०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ४ क्विंटल हळदीची आवक झाली आहे. १२ एप्रिल रोजी हिंगोली बाजारसमितीत १५००० रूपये दर मिळाला. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये लोकल हळदीला १९ हजार रूपये भाव मिळाला. या बाजारसमितीत हळदीला कमीतकमी दर हा १४ हजार जास्तीत दर हा २२ हजार रुपये दर मिळाला असुन ३ हजार क्विंटल हळदीची आवक झाली आहे.

काही बाजारसमितींमध्ये हळदीला समाधानकराक दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.