new-img

लासलगाव बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला किती मिळतोय दर?

लासलगाव बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला किती मिळतोय दर? 

मागील काही दिवसांपासुन कांदा दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने कांदा दरात घसरण होत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १३ एप्रिल रोजी सरासरी दर हा लासलगाव बाजारसमितीत १३०० रूपये दर मिळाला आहे. या बाजारसमितीत कमी दर हा ७०० ते जास्त दर हा १६०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ३ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे. लासलगाव-विंचुर बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला सरासरी दर हा १३७५ रूपये भाव मिळाला आहे. कमीतकमी भाव हा ७०० जास्तीत भाव हा १५२५ रुपये मिळाली असुन १०८०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे.

बाजारसमितींमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे. आवक वाढल्याने कांदा दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.