new-img

बाजारसमितीत हरभऱ्याची काय स्थिती? किती मिळतोय दर?

बाजारसमितीत हरभऱ्याची काय स्थिती? किती मिळतोय दर? 


मागील काही दिवसांपासुन हरभरा दरात तेजी आली आहे. देशातील हरभरा उत्पादनात यंदा घट येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हरभरा दरात काहीशी सुधारणा आली आहे. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षाही जास्त दर मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज पुणे बाजारसमितीत हरभऱ्याला दर हा ६८०० रूपये मिळाला आहे. कमीतकमी दर हा ६४०० तर जास्तीतजास्त दर हा ७२०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत ४३ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. जळगाव बाजारसमितीत आज काबुली हरभऱ्याला  ८००० रूपये  बाजारभाव मिळाला आहे. या बाजारात १५ क्विंटल काबुली हरभऱ्याची आवक झाली आहे.

सध्या बाजारात हरभऱ्याची आवक घटली आहे. त्यामुळे हरभरा दरात सुधारणा आली असुन उत्पादक शेतकरी समाधानी झाल्याचं पाहायला मिळत आहे.