new-img

सोयाबीनच्या भावात का होतेय घसरण?

सोयाबीनच्या भावात का होतेय घसरण

मागील काही दिवसांपासुन सोयाबीन दरात सतत घसरण सुरू आहे. यंदा दुष्काळ आणि अवकाळीमुळे देशातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जवळपास ३० ते ४० टक्कयांची घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. 

सध्या सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील काही दिवसांपासुन दर हा ४४०० ते ४५०० दरम्यान मिळत आहे. हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमी न सोयाबीनची विक्री होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.  सरकारने सोयाबीनला ४६०० रूपये MSP जाहीर केलीय. परंतु सोयाबीनची खरेदी-विक्री एमएसपी पेक्षा कमी दराने होत आहे. सोयाबीनला सध्या  सरासरी दर हा ४१०० ते ४५०० रूपये भाव मिळत आहे. थोडक्यात सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहेत. 

केंद्र सरकारची खाद्यतेल आयातीचे धोरण, त्यातच जागतिक पातळीवर सोयाबीनचे भरघोस उत्पादन, याचा थेट परिणाम राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावं लागत आहे. हमीभावापेक्षा सोयाबीनचे दर खाली गेली आहे. याचा फटका फक्त शेतकऱ्यांना बसत नसुन व्यापारी आणि उद्योजकासमोर देखील आता प्रश्न निर्माण झाला आहे. अभ्यासकांच्या मते पुढेही सोयाबीनचे दर वाढण्याची फारसी शक्यता नाही.