new-img

कोणत्या बाजारसमितीत मिळतोय ज्वारीला सर्वाधिक भाव

कोणत्या बाजारसमितीत मिळतोय ज्वारीला सर्वाधिक भाव

बाजारसमितींमध्ये दादर, हायब्रीड, मालदांडी, लोकल, रब्बी, शाळू आणि पांढऱ्या ज्वारीची आवक होत आहे. सध्या बाजारसमित्यांमध्ये ज्वारीची आवक ही वाढलेली आहे.सध्या ज्वारीला दर हा २ हजार ते ४ हजार ५०० रूपयांपर्यंत मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज १६ एप्रिल रोजी दादर ज्वारीला सरासरी दर हा जळगाव बाजारसमितीत २६५० रूपये दर मिळाला आहे. तर या बजारसमितीत ज्वारीची आवक ही ५६ क्विंटल झाली आहे. 
तर हायब्रीड ज्वारीला दर हा २२३५ रूपये मिळाला आहे. बाजारसमितीत सध्या ज्वारीला गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे. 
१५ एप्रिल रोजी सोलापुर बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला दर हा ३४०५ रूपये मिळाला आहे. तर पुणे बाजारसमितीत दर हा ४४०० रूपये मिळाला आहे.
सध्या ज्वारीची आवक वाढल्याने बाजारसमितीत दर हा ४५०० रूपयांपर्यंत मिळत आहे.