new-img

हळदीची मागणी वाढली

हळदीची मागणी वाढली

गेल्या काही दिवसांपासुन बाजारामध्ये हळदीची आवक कमी झाली त्यामुळे हळदीची मागणी वाढली. सध्या बाजारसमितींमध्ये हळदीला चांगला दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी समाधानी आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १६ एप्रिल रोजी सांगली बाजारसमितीत राजापुरी हळदीला  सरासरी दर हा १९ हजार ८०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत हळदीची आवक ही १६९९७ क्विंटल झाली. बसमत बाजारसमितीत हळदीला सरासरी दर हा १४७५० रूपये दर मिळाला. या बाजारसमितीत लोकल हळदीची आवक ही २०५० क्विंटल झाली आहे. मुंबई बाजारसमितीत हळदीला दर हा १९ हजार रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत हळदीची आवक ही ८१ क्विंटल झाली.

बाजारसमितींमध्ये हळदीला समाधानकारक दर मिळाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.