new-img

लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? जाणुन घ्या आजचे दर

लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? जाणुन घ्या आजचे दर 

कांद्याच्या दरात सतत चढउतार होत आहे. गेल्या काही दिवसांपासुन बाजारसमितींमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मात्र आवक वाढल्याने कांदा दरात सतत घसरण होत आहे. कांदा दरात होणाऱ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कांद्याची आवक वाढली आहे. आज 18 एप्रिल रोजी पुणे बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा १ हजार रूपये दर मिळाला आहे या बाजासमितीत आज लोकल कांद्याची १२३१६ क्विंटल आवक झाली आहे. पुणे-मोशी बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा ८०० रूपये मिळाला आहे. लाल कांद्याला सरासरी दर हा १ हजार ते १२०० रूपये मिळत आहे. 

कांद्याला सध्या सरासरी दर हा ९०० ते १५०० रूपयांच्या दरम्यान मिळत आहे. कांदा दरात होणाऱ्या या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.