new-img

बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव

बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव

ज्वारीची आवक बाजारात वाढली आहे. मालदांडी ज्वारीला सरासरी सर्वाधिक भाव मिळत आहे. बाजारसमितींमध्ये मालदांडी, लोकल, रब्बी, शाळू, पांढऱ्या, दादर, हायब्रीड ज्वारीची आवक होत आहे. ज्वारीला दर हा २ हजार ते ४ हजार ५०० रूपयांपर्यंत मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज १८ एप्रिल रोजी हायब्रीड ज्वारीला सरासरी दर हा जळकोट बाजारसमितीत  ३८७१ रूपये दर मिळाला आहे. तर या बजारसमितीत ज्वारीची आवक ही ६४ क्विंटल झाली आहे. 

१७ एप्रिल रोजी पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला दर हा ४३०० रूपये मिळाला आहे. तर पुणे बाजारसमितीत या ज्वारीची आवक ही ६९३ क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत जास्तीतजास्त दर हा ५२०० रूपयांपर्यंत मिळाला आहे. सध्या बाजारसमितींमध्ये इतर ज्वारींच्या तुलनेत सरासरी दर हा मालदांडी ज्वारीला समाधानकारक मिळत आहे.