new-img

तुरडाळीला बाजारात मागणी, किती मिळतोय दर?

तुरडाळीला बाजारात मागणी, किती मिळतोय दर? 

गेल्या अनेक दिवसांपासुन बाजारात तुरीचे दर हे वाढले आहेत. बाजारसमितींमध्ये सध्या तुरीला १२ हजारांपर्यंत दर मिळत आहे. आणि ह्या दराचा परिणाम हा तुरडाळीवर होत आहे. सध्या तुरडाळीला बाजारांत १७० ते १९० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

तुरीच्या दरात एप्रिल महिन्यात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम हा तुर डाळींवर होत असुन तुर डाळीचे दर हे १५ टक्यांपर्यंत वाढले आहेत. देशाला दरवर्षी तुरडाळीची ४६ लाख टन तुरीची गरज असते परंतु यंदा उत्पादन कमी झाले आहे. तुरीचे उत्पादन कमी झाल्याने यंदा डाळ ही कमीच होणार असुन जवळपास १५ लाख टनपर्यंत हा तुटवडा राहणार आहे. 

तुरीचे भाव वाढत असल्याने शेतकरी एकदाच तुर न विकता टप्प्याने तुर विकत आहे. त्यामुळे वर्षभर बाजारात तुर आणि तुर डाळीचे दर हे जास्तच राहण्याची शक्यता आहे.  जसजसे तुरीचे दर वाढतील तसेतसे तुर डाळीचे दर ही आपोआप वाढत राहतील. बाजार अभ्यासकांच्या मते यंदा उत्पादनात घट झाल्याने दर वाढणार असुन  तुर डाळ ही येत्या दोन महिन्यांत २१० ते २२० रुपयांपर्यंत जाऊ शकते.