new-img

लसणाच्या भावात काहीशी नरमाई

लसणाच्या भावात काहीशी नरमाई 

गेल्या अनेक दिवसांपासुन लसणाच्या दरात काहीशी नरमाई आली आहे. सध्या बाजासमितींमध्ये लसणाला सरासरी दर हा १० हजार ते १२ हजार रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार २३ एप्रिल रोजी पुणे-मोशी बाजारसमितीत लसणाला सरासरी दर हा १० हजार रुपये मिळाला आहे. या बाजारसमिती ३१ क्विंटल लसणाची आवक झाली आहे. कमीतकमी दर हा १० हजार तर जास्तीत जास्त दर हा देखील १० हजार रुपये मिळाला आहे. 

बाजारसमितीत लसणाची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात घसरण झाली आहे. सध्या लसणाची क्विंटलमागे २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. बाजारअभ्यासकांच्या मते लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील.