new-img

उन्हाळ कांद्याला कसा मिळतोय बाजारभाव

उन्हाळ कांद्याला कसा मिळतोय बाजारभाव 

बाजारसमितींमध्ये लाल, उन्हाळ कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार २२ एप्रिल रोजी उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक ही लासलगाव-विंचुर बाजारसमितीत झाली आहे. या बाजारसमितीत १९ हजार ३०० क्विंटल कांद्याची आवक झाली असुन या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ७०० रुपये मिळाला आहे. तर या बाजारसमितीत सरासरी दर हा १३७५ रूपये मिळाला आहे. संगमनेर बाजारमितीत उन्हाळ कांद्याला सर्वात कमी दर मिळाला. या बाजारसमितीत कांद्याला कमीतकमी फक्त २०० रूपये दर मिळाला आहे. तर सरासरी दर हा ११०० रुपये मिळाला आहे.

सध्या बाजारसमितींमध्ये लाल, उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक ही होत आहे. त्यामुळे कांदा दरात घसरण होत आहे. कांदा दरात घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.