new-img

राज्यात गव्हाला किती मिळतोय दर, जाणुन घ्या दर

राज्यात गव्हाला किती मिळतोय दर, जाणुन घ्या दर 

गेल्या  काही महिन्यांपासून बाजारात नव्या गव्हाची आवक ही वाढली आहे. मागील काही दिवसांपासुन गव्हाला सरासरी दर हा २ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे.

पालघर बाजारसमितीत २४ एप्रिल रोजी गव्हाला सरासरी दर हा ३ हजार ३२० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत गव्हाची आवक ही ७० क्विंटल झाली आहे. २३ एप्रिल रोजी पुणे बाजारसमितीत शरबती गव्हाला सरासरी दर हा ४९०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत गव्हाची आवक ही ४०८ क्विंटल झाली आहे.

बाजारसमितींमध्ये वेगवेगळे गहू हे विक्रीसाठी येत असुन त्यात शरबती, हायब्रीड, पिवळा, लोकल, बन्सी यांचा समावेश आहे. शरबती गव्हाला बाजारात सर्वाधिक दर हा मिळत आहे.