new-img

सोयाबीनला हमीभाव मिळतोय का?

सोयाबीनला हमीभाव मिळतोय का?  

गेल्या अनेक दिवसांपासुन बाजारसमितीत सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी दर हा ४ हजार २०० ते ४ हजार ६०० मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार सोयबीनला सध्या बाजारसमितीत कमी दर मिळत आहे. २३ एप्रिल रोजी सोयाबीनला सरासरी दर हा लासलगाव विंचुर बाजारसमितीत ४ हजार ४५० रूपये मिळाला आहे. कमीतकमी दर हा ३ हजार ते जास्तीत जास्त दर हा ४५०० रूपये मिळाला आहे. राहोरी-वांबोरी बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर हा ३ हजार रुपये मिळाला आहे. तर या बाजारसमितीत आवक ही १ क्विंटल झाली आहे. बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीन भावात अशीच चढउतार राहण्याची शक्यता आहे.